इस्लामी देशांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा नाहीच !

पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

लडाखमधील चीनचे बांधकाम ही चिथावणीखोर कृती ! – अमेरिकी सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांची टीका

अमेरिकेचे सिनेटर असे उघडपणे बोलतात; मात्र भारतातील खासदार असे बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत !

चीन ब्रह्मपुत्र नदीवर प्रचंड मोठे धरण बांधणार !

ईशान्य भारतासह बांगलादेशमध्ये दुष्काळाची शक्यता ! चीनचे हे भारतावर एक प्रकारचे आक्रमणच आहे. अशा घटना रोखण्यासाठी भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे !

संयुक्त अरब अमिरातकडून १३ देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी

अबुधाबीने इराण, सीरिया, अफगाणिस्तान पाकिस्तान आदी देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे.

श्रीलंकेतील कारागृहातील हिंसाचारात ८ कैद्यांचा मृत्यू, तर ३७ जण घायाळ

काही कैद्यांनी कारागृहामधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारागृह प्रशासनाला त्यांच्या विरोधात बळाचा वापर केल्यावर ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी देशभरात मोर्चे !

नेपाळसह भारतामध्येही ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यासाठी आता केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

पाकमध्ये सरकारने हिंदूंची घरे पुन्हा पाडली

पाकमधील असुरक्षित हिंदूंविषयी कुणी आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !

मृत्यूला घाबरू नका, युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या !

तुम्ही मृत्यूला घाबरू नका, तर युद्ध जिंकण्याच्या सिद्धतेवर लक्ष द्या, असे मार्गदर्शन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याच्या कमांडर्सना दिले आहे.

अणुशास्त्रज्ञाच्या हत्येचा सूड घेणार ! – इराणची इस्रायलला धमकी

इराणसाठी अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करणारे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांची बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली. या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप करत ‘या हत्येचा सूड घेण्यात येईल’, अशी धमकी इराणने इस्रायलला दिली आहे.

आतंकवादी कारवाया करणार्‍या मुसलमान धर्मगुरूचे नागरिकत्व ऑस्ट्रेलियाने काढले !

भारतात गेल्या ३ दशकांत असे कधीच घडलेले नाही, त्यामुळे भारतातील आतंकवादी आक्रमणे रोखता आलेली नाहीत ! भारत जिहादी आतंकवादी संघटनांवर कठोर होणार्‍या अन्य देशांकडून कधी शिकणार ?