पाकमध्ये सरकारने हिंदूंची घरे पुन्हा पाडली

पाकमधील असुरक्षित हिंदूंविषयी कुणी आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – सिंध प्रांतातील भील जातीच्या हिंदूंची अनेक घरे सरकारकडून पाडण्यात आली आहेत. याविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित झाल्यावर ही कारवाई थांबवण्यात आली; मात्र धर्मांधांनी या घरातील हिंदूंना तेथून पळवून लावले आहे. या वेळी काही हिंदू घायाळही झाले. पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी याचा व्हिडिओ ट्वीट करून ही माहिती दिली.