चीन ब्रह्मपुत्र नदीवर प्रचंड मोठे धरण बांधणार !

ईशान्य भारतासह बांगलादेशमध्ये दुष्काळाची शक्यता

चीनचे हे भारतावर एक प्रकारचे आक्रमणच आहे. अशा घटना रोखण्यासाठी भारतानेही चीनला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे !

बीजिंग (चीन) – तिबेटमधून उगम पावणार्‍या ब्रह्मपुत्र नदीवर चीन महाकाय धरण बांधणार आहे. जगातील सर्वांत मोठे धरण असलेल्या चीनमधील थ्री जॉर्जच्या तुलनेत या धरणातून तीन पट अधिक विद्युत् निर्मिती होणार आहे. चीनच्या या धरणामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेश येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनने याआधीच ब्रह्मपुत्र नदीवर लहान आकारांची धरणे बांधली आहेत; मात्र नवीन धरण हे विशाल आहे. त्यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे.

चीनच्या ऊर्जा निर्मिती महामंडळाचे अध्यक्ष आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे नेते यान झियोंग यांनी सांगितले की, पंचवार्षिक योजनेनुसार या धरणाचे बांधकाम करण्यात येणार आहे. ही योजना वर्ष २०२५ पर्यंत असणार आहे.

 (सौजन्य : South China Morning Post)

चीनमधील जलविद्युत् ऊर्जेशी संबंधित उद्योगासाठी ही मोठी संधी असून दरवर्षी ३०० अब्ज किलो वॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. चीनमध्ये प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मिती करण्याचे सरकारने ठेवले होते.