भारतात गेल्या ३ दशकांत असे कधीच घडलेले नाही, त्यामुळे भारतातील आतंकवादी आक्रमणे रोखता आलेली नाहीत ! भारत जिहादी आतंकवादी संघटनांवर कठोर होणार्या अन्य देशांकडून कधी शिकणार ?
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – मेलबर्नमध्ये वर्ष २००५ मध्ये एका फुटबॉल सामन्याच्या वेळी बॉम्बस्फोट घडवणार्या अल्जेरियामधील अब्दुल नसीर बेनब्रीका या मुसलमान धर्मगुरूचे नागरिकत्व रहित करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. स्फोट घडवून आणणार्या गटाचे नेतृत्व केल्याच्या प्रकरणी अब्दुल याला दोषी ठरवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात राहूनही देशाने नागरिकत्व काढून घेतलेला नसीर हा पहिलाच व्यक्ती ठरला आहे. अन्यथा एखाद्या व्यक्तीकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्याचे सिद्ध होते, तेव्हाच ऑस्ट्रेलियामध्ये नागरिकत्व रहित करण्याचा कायदा आहे.
अब्दुल विरोधात आतंकवादी संघटना चालवणे, आतंकवादी संघटनेचा भाग असणे आणि आतंकवादी आक्रमणाची योजना आखणे या प्रकरणामध्ये अब्दुल याला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये त्याला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कारावासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही खटला चालू असल्याने त्याला कारागृहातच ठेवण्यात आले आहे. देशातील आतंकवादी कायद्यानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही कोणत्याही व्यक्तीला पुढील ३ वर्षांसाठी कारागृहात ठेवता येते.

गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !