घोटाळेबाज मेहूल चोक्सी अँटिग्वामधून क्युबामध्ये पळाला !

पंजाब नॅशनल बँकेच्या १४ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पसार असणारा मुख्य सूत्रधार मेहूल चोक्सी याने दक्षिण अमेरिका खंडा जवळील अँटिग्वा बेटावरील पोलिसांना चकमा देऊन तेथून पळ काढल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्तसंस्थेने दिले आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतील ३ संशोधक कोरोनासारख्या लक्षणांमुळे पडले होते आजारी !

चीनची युद्धखोर आणि विस्तारवादी वृत्ती पहाता तो जगावर राज्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाली किंबहुना हा विषाणू मुद्दामहून निर्माण केला गेला, असे म्हणण्यास वाव आहे !

कोरोनाच्या काळात विदेशात गायीला मिठी मारण्याचा प्रकार नागरिकांसाठी ठरत आहे लाभदायक !

विदेशात ‘काऊ थेरपी’ (गो उपचार) प्रचलीत होत आहे. भारतात असे कधीतरी शक्य आहे का ? विदेशींना गायीचे महत्त्व कळते. भारतात मात्र गोमातेचे महत्त्व हिंदु संस्कृतीत अधोरेखित केले असतांनाही गोहत्या रोखण्यासाठी किंवा गोसंवर्धनासाठी काहीही होत नाही, हे संतापजनक !

ब्राझिलच्या राष्ट्रपतीकडून कोरोना नियमावलीचा भंग केल्याने त्यांना दंड

ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.

एकीचे बळ आणि फळ !

इस्रायल केवळ ‘ज्यू’ धर्माच्या आधारे एक होऊन जगावर भारी ठरत असेल, केवळ ‘इस्लाम’साठी ५७ इस्लामी राष्ट्रे एक होऊ शकत असतील, तर १०० कोटी हिंदूंच्या ‘हिंदु’ धर्माच्या आधारे भारत एक होऊन बलशाली होऊ शकत नाही का ?

नेपाळमध्ये होणार मध्यावधी निवडणुका !

नेपाळमध्ये पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि विरोधी पक्ष यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना निवेदन देऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.

कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट ! – जागतिक आरोग्य संघटना

वर्ष २०२० मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्‍यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत अल्प दाखवली जात आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशजवळील सीमेपर्यंत बांधला महामार्ग !

चीन वारंवार कुरापती काढत असून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण राबवून त्याला धडा शिकवणे आवश्यक !

इस्रालयकडून युद्धबंदीची घोषणा !

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत.

अँटार्क्टिकाजवळ महाकाय बर्फाचा तुकडा वितळला !

कोरोना, चक्रीवादळ आणि आता हिमनग वितळून समुद्राच्या पातळीत झालेली वाढ, ही सर्व आपत्काळाची लक्षणे आहेत ! अशा भीषण आत्पकाळाला सामोरे जाता यावे, यासाठी आता तरी साधना करा !