नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतील ३ संशोधक कोरोनासारख्या लक्षणांमुळे पडले होते आजारी !

वुहानमधूनच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा वॉल स्ट्रीट जर्नलचे मत !

चीनची युद्धखोर आणि विस्तारवादी वृत्ती पहाता तो जगावर राज्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाली किंबहुना हा विषाणू मुद्दामहून निर्माण केला गेला, असे म्हणण्यास वाव आहे !

नवी देहली – चीनमधूनच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अनेक देशांचा आरोप आहे; मात्र चीनने तो आतापर्यंत फेटाळला आहे. आता या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. ‘नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहानच्या ज्या ‘वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी’ प्रयोगशाळेतून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दावा केला जात आहे त्या प्रयोगशाळेतील ३ संशोधकांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या वेळी जगाला करोना संसर्गाची कोणतीही कल्पना नव्हती’, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्ताच्या आधारे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. नोव्हेंबर २०१९ नंतरच जगात कोरोनाचा संसर्ग झाला.

१. या वृत्तानुसार तिन्ही कर्मचार्‍यांमध्ये कोरोनासारखी लक्षणे होती. या वृत्तामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालाचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालामध्ये चीनने तिसर्‍या महायुद्धासाठी जैविक शस्त्रांची निर्मिती करण्याचा ६ मासांपूर्वीच प्रयत्न चालू केल्याचे म्हटले आहे.

२. कोरोनाचा संसर्ग नेमका कुठून झाला, यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना अन्वेषण करत आहे. यासाठी त्यांचे एक पथक वुहानमध्येही गेले होते. जागतिक आरोग्य संघटना तपासातील पुढचा टप्पा निश्‍चित करत असतांनाच ही माहिती समोर आली आहे. चीनने अन्वेषण करणार्‍या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला कोरोनाच्या प्रारंभीच्या काळातील माहिती देण्यास नकार दिला होता.