मानसिक तणावावर मात करण्यासाठी उपयुक्त उपाय असल्याचे अमेरिका आणि युरोप येथील लोकांचे मत !
विदेशात ‘काऊ थेरपी’ (गो उपचार) प्रचलीत होत आहे. भारतात असे कधीतरी शक्य आहे का ? विदेशींना गायीचे महत्त्व कळते. भारतात मात्र गोमातेचे महत्त्व हिंदु संस्कृतीत अधोरेखित केले असतांनाही गोहत्या रोखण्यासाठी किंवा गोसंवर्धनासाठी काहीही होत नाही, हे संतापजनक !
मुंबई – कोरोनाच्या काळात असलेल्या मानसिक तणावावर मात करण्यासाठी अमेरिका आणि युरोप येथील लोकांनी गायीला मिठी मारण्याचा प्रकार चालू केला आहे. त्यासाठी अनेकजण १४ सहस्र ५०० रुपयांपर्यंत पैसेही देत आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचा प्रयत्न विदेशात केला जात असल्याचे समोर आले होते; मात्र कोरोनाच्या काळात त्यात वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. गायीला मिठी मारल्याने केवळ मानसिक तणाव दूर होतो असे नाही, तर यामुळे निरोगी रहाण्यासही पुष्कळ लाभ होत असल्याचे यापूर्वी समोर आले होते.
गायीला मिठी मारण्यासाठी अमेरिकन करताहेत खर्च, जाणून घ्या कारण!https://t.co/oSziTwBoMS#Cow #Cowhugging #CowCuddling #therapy #stressrelief #Stress #Viralnews
— Maharashtra Times (@mataonline) May 24, 2021
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, गायीला मारलेली एक मिठी हार्मोन ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या ट्रिगरचे काम करते. कोर्टिसोल न्यून करते. तसेच तणावाची पातळी, चिंता आणि अस्वस्थपणाचे लक्षणही यामुळे न्यून होतात. गायीचा स्वभाव शांत, कोमल आणि ध्यैर्यवान आहे. गायीशी गळाभेट घेतल्याने व्यक्तीच्या शरिरात मेटाबोलिझम, इम्युनिटी आणि तणाव यांच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी साहाय्य होते.