नेपाळमध्ये होणार मध्यावधी निवडणुका !

राष्ट्रपतींनी विसर्जित केली प्रतिनिधी सभा !

नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी

काठमांडू (नेपाळ) –  नेपाळमध्ये पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि विरोधी पक्ष यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना निवेदन देऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता; मात्र राष्ट्रपती भंडारी यांनी यांपैकी कुणालाही सरकार स्थापन करण्यास आमंत्रित न करता प्रतिनिधी सभा विसर्जित करत मध्यावधी निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. येत्या नोव्हेंबर मासामध्ये या निवडणुका घेण्यात येणार आहेत. १२ आणि १९ नोव्हेंबर या दिवशी मतदान करण्यात येणार आहे.