वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

मुसलमानबहुल देशातील अल्पसंख्यांक हिंदूंची स्थिती !

  • हिंदूंवरील आक्रमणाच्या ४० सहस्र ७०३ घटना

  • देवतांच्या ३७० मूर्तींची तोडफोड

  • १६३ मंदिरांची तोडफोड

  • २ सहस्र १२५ हिंदु कुटुंबियांचे देश सोडून पलायन

  • भारत बहुसंख्य हिंदूंचा देश असतांना अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक असणार्‍या धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात, तरीही धर्मांधांना ‘धर्मनिरपेक्ष’ आणि हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवले जाते !
  • बांगलादेशातच नव्हे, तर पाकिस्तान, अफगाणिस्तान येथेही अशाच प्रकारच्या घटना घडतात आणि भारतासह जगभरातील हिंदू निष्क्रीय रहातात !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये वर्ष २०२० मध्ये विविध घटनांमध्ये एकूण १४९ हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, तर ७ सहस्र ३६ हिंदू घायाळ झाले. तसेच २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवण्यात आले. ‘जटिया हिंदू महाजोत’ या संघटनेने पत्रकार परिषद घेऊन ही आकडेवारी दिली आहे. वर्ष २०१९ च्या तुलनेत या घटनांची संख्या अधिक आहे. वर्ष २०१९ मध्ये विविध घटनांत १०८ हिंदूंच्या हत्या झाल्या होत्या, तर  ४८४ हिंदू घायाळ झाले होते.

या संघटनेचे सरचिटणीस गोबिंद चंद्र प्रमाणिक यांनी सांगितले की,

१. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात ९४ हिंदूंचे अपहरण करण्यात आले. वर्ष २०१९ मध्ये ७६ हिंदूंचे अपहरण झाले, तर १८ हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले.

२. वर्ष २०२० मध्ये ५३ हिंदु महिला आणि मुली यांच्यावर बलात्कार करण्यात आले आणि ३७० मंदिरांतील मूर्तींची तोडफोड करण्यात आली. वर्ष २०१९ मध्ये ही संख्या अनुक्रमे ४२ आणि २४६ इतकी होती.

३. वर्ष २०२० मध्ये मंदिरांच्या तोडफोडीच्या १६३ घटना घडल्या. वर्ष २०१९ मध्ये त्या १५३ घडल्या होत्या.

४. गेल्या वर्षी २ सहस्र १२५ हिंदु कुटुंबियांना देश सोडून जाण्यास बाध्य करण्यात आले. वर्ष २०१९ मध्ये ३७९ कुटुंबियांनी देश सोडला होता.

५. वर्ष २०२० मध्ये हिंदूंवरील विविध आक्रमण आणि अत्याचार यांच्या ४० सहस्र ७०३ घटना घडल्या, तर वर्ष २०१९ मध्ये त्या ३१ सहस्र ५०५ इतक्या घडल्या होत्या.