ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या उद्रेकामुळे भारत दौर्‍यावर येऊ शकत नाही !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधान मोदी यांना दूरभाष  

बोरिस जॉन्सन

नवी देहली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे नियोजित भारत दौरा रहित केला आहे. याविषयी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरभाष करून ‘कोरोनाच्या नव्या प्रकारच्या वाढत्या प्रकोपामुळे दळणवळण बंदी घोषित करावी लागली आहे. अशावेळी मी ब्रिटनमध्येच रहाणे अधिक संयुक्तिक आहे. ब्रिटनला माझी आवश्यकता असून कोरोनाविरोधात लढा देणे महत्त्वाचे आहे’, अशी माहिती दिली. भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या राजपथावरील संचलनासाठी यंदा जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते.