सैन्याने कुठल्याही क्षणी कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा आदेश

शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – कुठल्याही क्षणी कारवाईसाठी पीपल लिबरेशन आर्मी सिद्ध असली पाहिजे. पूर्णवेळ युद्धजन्य परिस्थितीसाठी तुम्ही स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. प्रशिक्षण सरावामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करा. पूर्णवेळ सज्ज रहाण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध वातावरणातील सराव आणखी वाढवा, असा आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला दिला. जिनपिंग यांनी युद्ध कोणासमेवत करायचे आहे, याविषयी मात्र काहीही म्हटलेले नाही. गेल्या काही मासांपासून लडाखच्या सीमेवर भारतीया सैन्यासमवेत असलेल्या वादावरून भारताविरोधात सज्ज रहाण्याचेच हे आवाहन असल्याचे म्हटले जात आहे. भारताप्रमाणेच चीनचे दक्षिण चीन सागरातही अमेरिका आणि तैवान यांच्यासमवेत वाद चालू आहेत. चीनचे राष्ट्रपती बनल्यापासून शी जिनपिंग सैन्याला युद्धासाठी सिद्ध करण्यावर भर देत आहेत.