बँकॉक (थायलँड) – थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदानुसार एका वनस्पतीच्या अर्काच्या वापरास मान्यता दिली. मानवावर करण्यात आलेल्या चाचण्यांत असे दिसून आले की, हे औषध घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम न होता उपचारानंतर ३ दिवसांत रुग्णांची परिस्थिती सुधारली.
१. मंत्रालयाने ६ जानेवारीला जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अॅन्ड्रोग्राफिस पानिकुलाटा’ या वनस्पतीचा अर्क पर्यायी उपचार म्हणून काम करील. प्रारंभी ५ सरकारी रुग्णालयांत उपचार उपलब्ध होतील.
२. थायलँडमध्ये ‘फह तलाई जोन’ या नावाने ओळखल्या जाणार्या या वनस्पतीतील अर्कामुळे विषाणूचा तीव्रता आणि परिणाम न्यून होऊ शकतो, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.