राजापूरचे वाहतूक नियंत्रक एस्.टी. सेवेतून बडतर्फ

बनावट शिक्का मारून आणि जादा पैशांची आकारणी करून एस्.टी. पासच्या विक्रीत २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी निलंबित असलेले येथील वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर एस्.टी. सेवेतून बडतर्फ !

लेप्टोस्पायरोसिस, अतीसार, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांविषयी सतर्क रहा ! – डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित उपचार घ्यावेत.

बिहार विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ !

किती हिंदु लोकप्रतिनिधी संस्कृतमधून शपथ घेतात ? शकील अहमद खान यांनी संस्कृतला मृतभाषा ठरवणार्‍या काँग्रेसला संस्कृतविषयी योग्य धडा शिकवला पाहिजे !

प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होणार्‍या आमदारांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून समज

भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.

मुरगाव बंदरातील कोळसा प्रदूषणावर देखरेख ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा ‘गोवा प्रदूषण मंडळा’ला आदेश

मुरगाव पोर्ट ट्रस्टसाठी कोळशाव्यतिरिक्त अन्य पर्याय शासन शोधत आहे.

पुण्यात कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश

शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्यावसायिक आस्थापने, तसेच सार्वजनिक ठिकाणी केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांवर कारवाई ! – सांगली महापालिका आयुक्त

सार्वजनिक ठिकाणी कोरोना संबंधीच्या उपाययोजना केल्या जात नाहीत किंवा कोरोना संबंधीच्या आदेशाचे पालन होत नाही, त्या आस्थापनांना एक लेखी सूचना देऊन ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. 

कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने १८००-२३३-१९१३ या ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा चालू केली असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त

कार्तिकी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी शहर आणि परिसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अयोध्येतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव !

अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.