|
पाटलीपुत्र (बिहार) – बिहार विधानसभेमध्ये एम्आयएम्चे आमदार अख्तरूल इमान यांनी उर्दूतून शपथ घेतांना हिंदुस्थान बोलण्यास नकार दिला होता, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी उर्दूऐवजी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. त्यांच्या या कृतीचे विधानसभेतील सर्वच आमदारांनी स्वागत केले.
Dr. Shakil Ahmad Khan ने #Sanskrit में ली शपथ, #BiharVidhansabha में मेज थपथपाने लगे MLA#BiharTak pic.twitter.com/OALr1LTkjb
— Bihar Tak (@BiharTakChannel) November 23, 2020
संस्कृत भारताची आत्मभाषा !
शपथ घेतल्यावर शकील अहमद खान म्हणाले की, उर्दू माझी मातृभाषा आहे. तिला वाढवण्यासाठी मी आवाज उठवत रहाणार आहे; मात्र संस्कृत ही भारताची आत्मभाषा आहे. ही सभ्यता आणि संस्कृती यांची भाषा राहिलेली आहे. काळाच्या ओघात ती सर्वसामान्यांची भाषा राहिलेली नाही. मला संस्कृत आधीपासूनच आवडते. सर्वच भाषा योग्य आहेत. कोणत्याही भाषेविषयी भेदभाव होऊ नये आणि कोणतीही भाषा कुणावर थोपली जाऊ नये. हेच सरकारचेही धोरण असले पाहिजे.
शकील अहमद यांनी शपथ घेतांना ‘हिंदुस्थान’ शब्द बोलण्याचे नाकारणारे अख्तरूल इमान यांच्यावर टीका करतांना म्हटले की, ते यापूर्वीही आमदार राहिलेले आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच शपथ घेतलेली नाही. त्यांनी यापूर्वी का नाही ‘हिंदुस्थान’ शब्दावर आक्षेप घेतला, हे त्यांनी आठवले पाहिजे.