कोल्हापूर – येथील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने १८००-२३३-१९१३ या ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा चालू केली असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. महापालिकेच्या संदर्भातील गटार स्वच्छ करणे, औषध फवारणी, कचरा उठाव, किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमण, पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारी, विजेच्या खांबांवर बल्ब बसवणे, स्वच्छता आणि आरोग्य यांच्या संदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी महापालिकेत न जाता स्वतःच्या निवासस्थानाहून तक्रार नोंद करावी. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केल्यानंतर त्यांच्या भ्रमणभाषवर लघुसंदेशाद्वारे कळवण्यात येणार आहे. आतापर्यंत ६ सहस्र ३३८ तक्रारी प्रविष्ट करण्यात आले असून ६ सहस्र ३११ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा
कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा
नूतन लेख
- ३० हून अधिक स्मरणपत्रे; परंतु ११ वर्षांनंतरही मराठी अभिजात भाषेच्या दर्जापासून वंचित !
- महाराष्ट्रात राबवले जात आहे ७ वर्षांपूर्वीचे क्रीडा धोरण !
- देवीची शिकवण प्रत्येक आईने तिच्या मुलीला द्यावी ! – सौ. क्षितिजा देशपांडे
- श्री क्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’च्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तृतीय पश्चिम द्वार सोहळा !
- कामकाजाची माहिती संकेतस्थळावर न ठेवणार्या जनमाहिती अधिकार्यांच्या विरोधात राज्य माहिती आयोग करणार दंडात्मक कारवाई !
- महाराष्ट्रात ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन !