पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी शहर आणि परिसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेच्या पहार्यासाठी १ सहस्र ८०० पोलीस बंदोबस्तासाठी येथे आले असून तिहेरी नाकेबंदी करण्यात आली आहे.
सौजन्य : ABP माझा
कार्तिकी वारीच्या कालावधीत पंढरपूर येथे मांस विक्रीस बंदी
सोलापूर – कार्तिकी वारीच्या कालावधीत २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर शहरात मांस विक्री आणि प्राणी हत्या यांसाठी अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी बंदीचे आदेश दिले आहेत.