पुण्यात कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश

अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल

पुणे – शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्यावसायिक आस्थापने, तसेच सार्वजनिक ठिकाणी केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संदर्भातील नियमित तपासणी करण्यासाठी, तसेच नियमांचे पालन केले जात नसल्यास संबधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. त्यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत. ४ जणांच्या या पथकात महापालिका आणि स्थानिक पोलिसांच्या प्रत्येकी २ कर्मचार्‍यांचा समावेश असणार आहे.