एस्.टी. पासची जादा पैशाने विक्री करून २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार
राजापूर (जिल्हा रत्नागिरी) – बनावट शिक्का मारून आणि जादा पैशांची आकारणी करून एस्.टी. पासच्या विक्रीत २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी निलंबित असलेले येथील वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर यांना एस्.टी. सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती एस्.टी.चे विभागीय वाहतूक अधीक्षक अनंत जाधव यांनी दिली. मागील वर्षी हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणाच्या चौकशीत बाकाळकर दोषी आढळले होते.
येथील वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असणारे अभिजित बाकाळकर यांनी १ एप्रिल २०१९ या दिवशी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सवलतीच्या पासात गैरव्यवहार केल्याचे विभागाला लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ निलंबित करण्यात आले होते. बाकाळकर हे ४० रुपयांचा पास बनावट शिक्का मारून ४०० रुपयांना विक्री करत होते. त्यामुळे काही लोकांनी याविषयी विभागाकडे तक्रार केली होती. या चौकशीअंती बाकाळकर हे दोषी आढळून आले होते.