टॉप्स सिक्युरिटी’ आस्थापनाचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंद
महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्यातील कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे.
महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्यातील कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे.
मालमत्ताकर धारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनी ‘मालमत्ताकर अभय योजना २०२०-२१’ घोषित केली आहे.
मूल्यांकनात पात्र ठरलेल्या खासगी शाळांना अनुदान पात्र घोषित करणे आणि २० टक्के अनुदानाने चालू असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देणे, असा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर मधील बैठकीत घेतला आहे.
प्रक्रिया शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणार्या खासगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राजकीय साठमारीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना प्रलंबित रहात असतील, तर जनतेच्या कराची होणारी उधळपट्टी कधीच थांबणार नाही.
कोरोनावर मात करण्याच्या कामामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. यासंदर्भात भ्रष्टाचाराच्या ४० सहस्र तक्रारी केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये मंत्रालयांतील घोटाळे, लाचखोरी, निधीची भरपाई, तसेच सरकारी अधिकार्यांकडून केला गेलेला छळ, अशा तक्रारींचा समावेश आहे.
कोरोनामुळे धर्मादाय आयुक्तालयातील अनिर्णित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज चालू करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे.
देहलीत चालू असलेले शेतकर्यांचे आंदोलन सरकारने कुठेही दडपलेले नाही, उलट त्यांच्याशी आतापर्यंत ५ फेर्यांची चर्चा झालेली आहे. तरीही भारताची अपकीर्ती करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्चात्त्य देश जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे !
केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदी आणि इंग्रजी यांसह राज्याच्या प्रादेशिक भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे.
कोरोनाची चाचणी करण्यास असहकार्य करणार्या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे