गुन्हेगारीत बिहार राज्यातील पाटणानंतर महाराष्ट्रातील नागपूर दुसर्‍या क्रमांकावर !

नागपूरला ‘गुन्हेगारी शहर’(क्राईम सिटी) म्हणूनही संबोधले जात आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना मानवाधिकार आयोगाकडून नोटीस

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना नोटीस

जालना येथील हुतात्मा सैनिक गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कर्तव्य बजावत असतांना सैनिक गणेश संतोषराव गावंडे (वय ३८ वर्षे) यांचे निधन झाले.

मनसेचे पदाधिकारी लाच स्वीकारतांना पोलिसांच्या कह्यात !

तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसच्या वतीने मनसे अधिकारी कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली.

‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी अन्य पर्याय उपलब्ध होतो का ? हे पहात आहोत ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

रत्नागिरी जिल्हा ‘ॲग्रिकल्चर झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना विचारले

गेली ७२ वर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणारे गाव ‘बेल्लद बागेवाडी’

बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पहाणी

केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांच्या पथकाने येथे अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची २२ डिसेंबर या दिवशी पहाणी केली. या वेळी त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर येथे झालेल्या हानीक्षेत्राची पहाणी केली.

५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वीज वितरण आस्थापनाचे कनिष्ठ अभियंता अटकेत

विद्युत् जोडणीचे मीटर बसवल्याचे बक्षीस म्हणून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महाराष्ट्र राज्य विद्युत् महावितरण आस्थापनेचे कनिष्ठ अभियंता अमोल बाळासो कणसे आणि सरकारी ठेकेदार हारुण लाटकर यांना अटक केली आहे.

केरळमधील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणात २८ वर्षांनंतर पाद्री आणि नन दोषी !

चर्च आणि त्याच्याशी निगडित संस्था हे अनाचाराचे अड्डे ! या प्रकरणात गुन्हेगारी वृत्तीच्या पाद्री आणि नन यांना वाचवणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई हवी ! हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारे पुरोगामी आणि निधर्मीवादी आता गप्प का ?

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.