महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांच्या दौर्यात सहभागी झालेल्या एका अधिकार्याचा कोरोनामुळे मृत्यू
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले होते. या दौर्यात शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेतल्या.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले होते. या दौर्यात शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेतल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात २८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राजकीय नेत्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
पुण्यासारख्या मोठ्या शहरात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धच न होणे दुर्दैवी !
संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असल्यामुळे सर्वच ठिकाणची आरोग्ययंत्रणा अपुरी पडू लागली आहे आणि त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी आतापर्यंत आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने अशा आपत्काळात जनतेचे हाल होत आहेत, हे स्पष्ट आहे !
कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.
राज्यात १३ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र ५०४ चाचण्यात यांपैकी कोरोनाबाधित ५६२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
विरार-वसई येथील विदारकता ! प्रत्यक्षात १०० सिलेंडरची आवश्यकता, तुटवड्याअभावी गाडीतील ऑक्सिजनच्या सिलेंडरची चोरी-‘भीषण आपत्काळ अगदी समीप आला आहे’, हेच या सर्व घटना दर्शवतात !
जेव्हा स्थुलातील प्रयत्न न्यून पडतात, तेव्हा सूक्ष्मातील प्रयत्न करावे लागतात. विविध संप्रदायांनी त्यांच्या उपासकांना देवाची भक्ती करण्यास सांगितले. औषधांसमवेत प्रार्थना आणि नामजप आदी उपाय केल्याने कोरोनापासून त्यांचे रक्षण झाले. याची नोंदही प्रशासनाने घेण्याची आज वेळ आली आहे !
गृहविलगीकरण नियमांचे उल्लंघन करणार्यांवर सांगली ग्रामीण, पलूस, भिलवडी, कडेगाव अशा विविध ठिकाणी कारवाई करून ५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.