महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांच्या दौर्‍यात सहभागी झालेल्या एका अधिकार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू 

दादा भुसे

कणकवली – महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे ९ एप्रिल या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या होत्या, तसेच विविध उपक्रमांनाही भेटी दिल्या होत्या. या दौर्‍यात त्यांच्यासमवेत असलेल्या एका अधिकार्‍याची कोरोना चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली होती. त्यामुळे त्या अधिकार्‍याला कणकवली येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १३ एप्रिल या दिवशी सकाळी त्या अधिकार्‍याचा मृत्यू झाला. त्यामुळे या दौर्‍यात सहभागी झालेले राजकीय पक्षांचे नेते, अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.