५६२ नवीन रुग्ण : चाचण्यांच्या २२.४४ टक्के कोरोनाबाधित
पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – राज्यात १३ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र ५०४ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी कोरोनाबाधित ५६२ नवीन रुग्ण सापडले आहेत. चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण २२.४४ टक्के आहे. दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आणि यामुळे एकूण मृत्यू ८५३ झाले आहेत. दिवसभरात २३६ रुग्ण बरे झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार चालू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४ सहस्र ८८८ वर पोचली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मडगाव कोविड केंद्रात ५२३ आहेत. त्यापाठोपाठ पर्वरी ४६०, फोंडा ३६९, पणजी ३४०, म्हापसा ३३०, कांदोळी ३११, कुठ्ठाळी २७५ आणि वास्को २३९, असे रुग्ण आहेत. प्रवाशांपैकी १८ प्रवासी कोरोनाबाधित आहेत.