पुणे येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठाच नाही !

२३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण इंजेक्शनविना

पुण्यासारख्या मोठ्या शहरात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धच न होणे दुर्दैवी !

पुणे – येथील कोणत्याही रुग्णालयात १४ एप्रिल या दिवशी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आलेला नाही. २ दिवसांपासून येथे या इंजेक्शनचा अपुरा पुरवठाच होत आहे. पुण्यात प्रतिदिन १५ सहस्रांहून अधिक नागरिक कोरोनाबाधित होत आहेत. सद्य:स्थितीत २३ सहस्र रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे येथे किमान १५ सहस्रांहून अधिक इतक्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन पुरवणे आवश्यक आहे; मात्र १२ एप्रिल या दिवशी भाग्यनगर येथून ५ सहस्र ९००, तर १३ एप्रिल या दिवशी केवळ ३ सहस्र ७०० इतक्या संख्येतच ही इंजेक्शने आली. १४ एप्रिल या दिवशी एकाही रुग्णालयात इंजेक्शनचा सायकांळपर्यंत पुरवठा झालेला नव्हता.