B’desh Devi Saraswati Idol Vandalised : बांगलादेशात मंदिरातील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची मुसलमानाकडून तोडफोड

गेल्या वर्षीही याच मुसलमानाने केली होती इस्कॉनच्या मंदिरात तोडफोड

महंमद मिराजुद्दीन आणि तोडफोड केलेल्या मूर्ती

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील फरीदपूरमध्ये एका मुसलमान तरुणाने काली मंदिरात घुसून श्री सरस्वतीदेवीची मूर्ती तोडली. आरोपीचे नाव महंमद मिराजुद्दीन असे आहे. भक्तांनी त्याला रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.

मंदिर समितीच्या सदस्यांच्या मते, काली मंदिर ४ फूट उंच भिंतीने वेढलेले आहे. अशा परिस्थितीत मिराजुद्दीनने सहजपणे मंदिरात प्रवेश केला. ३ फेब्रुवारी या दिवशी मंदिरात श्री सरस्वतीदेवीच्या पूजेची सिद्धता चालू असतांना ही घटना घडली.

मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगून सोडले !

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये फरीदपूर इस्कॉन मंदिरातील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात हाच मिराजुद्दीनचा सहभाग होता. त्या वेळी त्याला मानसिकदृष्ट्या  अस्थिर असल्याचे घोषित करून त्याला सोडण्यात आले होते. (मुसलमान मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्यावर आणि नसल्यावरही हिंदूंना, त्यांच्या मंदिरांना लक्ष्य करतो. यातून त्यांची मानसिकता हिंदूंच्या संदर्भात किती विद्वेषी आहे, हे लक्षात येते ! अशांसमवेत धर्मनिरपेक्षता, बंधूभाव कधीतरी ठेवता येऊ शकतो का ?  – संपादक)

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित झाली आहेत आणि त्यांना कुणीच वाली उरलेला नाही, हेच परत परत दिसून येत आहे. जे जगभरातील हिंदूंना लज्जास्पद आहे !