महंमद याच्याकडून फेसबुकवर हिंदूंच्या देवतांविषयी अश्लील भाषेत ‘पोस्ट’ !

बजरंग दलाकडून मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार

मडगाव, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – फेसबुकवरून हिंदूंच्या देवतांविषयी अश्लील भाषेत पोस्ट प्रसारित करणार्‍या महंमद उपाख्य बालबट्टी या सरकारी नोकराच्या विरोधात बजरंग दलाचे सासष्टी प्रमुख भगवान रमेश रेडकर यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

या तक्रारीत रेडकर यांनी म्हटले आहे, ‘‘७ फेब्रुवारी २०२५ या दिवशी फेसबुकवरून महंमद उपाख्य बालबट्टी हा सरकारी नोकर हिंदूंच्या देवतांविषयी अश्लील भाषा वापरून छायाचित्रे आणि ‘पोस्ट’ प्रसारित करून जातीय सलोखा बिघडवत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याने ‘पोस्ट’ केलेली छायाचित्रे आणि त्याविषयीचे लिखाण अत्यंत आक्षेपार्ह असून त्यामुळे माझ्या अन् सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही ‘पोस्ट’ फेसबुकवरून काढून न टाकल्यास ती सर्वत्र प्रसारित होत राहील आणि हिंदूंचा धार्मिक भावना दुखावतील. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. त्याने
मुद्दामहून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच त्याने हिंदूंच्या देवतांविषयी केलेल्या मानहानीकारक विधानांवरून त्याचा हिंदु धर्माविषयीचा द्वेष आणि हिंसाचाराची भावना दिसून येते. या कृतीचा हिंदु धर्मातील लोकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून ही कृती सहज आहे, असे समजू नये. महंमद याच्यावर कारवाई करून त्याच्या विरोधात कायद्यातील योग्य कलमानुसार प्रथमदर्शनी अहवाल सिद्ध करावा आणि अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक पावले उचलावीत.’’

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान शिक्षित असले, तरी त्यांचा हिंदुद्वेष अल्प होत नाही ! अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !