
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
ढाका (बांगलादेश) – बागंलादेशातील सिराजगंजमधील काजीपूर उपजिल्हा येथे ‘शिखा स्मृती सर्व जन दुर्गा मंदिरा’वर आक्रमण करून तेथील मूर्तीची तोडफोड करण्यात आली. १ मार्चच्या रात्री ही घटना घडली.
१. मंदिराचे काळजीवाहक जतिन कुमार कर्माकर यांनी सांगितले की, कुणीतरी बाहेरून मंदिराच्या आत बाँब फेकला आणि मूर्ती फोडली. प्रत्येक रविवारी सकाळी मी मंदिरात पूजा करण्यासाठी जातो. २ मार्चला मी तिथे गेलो, तेव्हा मूर्ती तुटलेली दिसली. या प्रकरणी प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
२. काझीपूर उपजिल्हा कार्यकारी अधिकारी दिवाण अकरमुल हक आणि काझीपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी नूरी आलम यांनी घटनास्थळी भेट दिली. नूरी आलम म्हणाल्या की, घटनेच्या ठिकाणाची पहाणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी मंदिरातील पवित्र मूर्तीची हानी करण्यात आली. यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिका
|