नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्यासाठी व्यापक जनजागृती !

हिंदु जनजागृती समितीकडून वर्ष २०२१ मध्ये ३१ डिसेंबरविरोधी करण्यात आलेल्या जनजागृतीची संख्यात्मक माहिती देत आहोत . . .

गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु संस्कृतीच्या महानतेविषयी प्रबोधन करणार्‍या या प्रसारमाध्यमांचा अधिकाधिक परिणामकारक वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

जोगश्वरी (मुंबई) येथील शिकवणीवर्गांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले.

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम !

सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये येथे व्याख्यान देणे, राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन करणे, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देणे आदी विविध मार्गाने जागृती करण्यात आली.

नवर्षारंभ ‘३१ डिसेंबर’ला नव्‍हे, तर गुढीपाडव्‍याला साजरा करा !

वर्तमान स्‍थितीत ३१ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्रीपासून तथाकथित नववर्ष स्‍वागतासाठी आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्‍स, सार्वजनिक, ऐतिहासिक ठिकाणे येथे प्रचंड प्रमाणात दारू पिऊन, अभक्ष्य भक्षण करते. या संस्‍कृतीविरोधी गोष्‍टी थांबवण्‍यासाठी व्‍यापक स्‍तरावर जागृती करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठीच हा लेखप्रपंच !

नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच ! – आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था

हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होते. त्यामागे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक कारणे आहेत. याउलट १ जानेवारीलाच नवीन वर्ष का ? याला कुठलाही आधार नाही.त्यामुळे नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.

घराजवळ लावलेल्या तुळशीच्या रोपाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

घराजवळ लावलेली तुळशीची रोपे आपोआप जळणे आणि गुढीपाडव्याला तुळशीचे रोप लावल्यावर ‘त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, ह्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार

४ ते १९ एप्रिल या कालावधीत लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला ५००० हून अधिक जिज्ञासू आणि १०० हून अधिक संत यांनी भेट दिली.

गुढीपाडव्यानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन 

जिज्ञासूंना प्रवचने अतिशय आवडली. त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम परत परत घेण्याची मागणी केली.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ४६६ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन !

यामध्ये काही वाचक आणि धर्मप्रेमी यांनी स्वत: प्रवचने घेतली, तर काही ठिकाणी नामसत्संगांमध्ये सहभागी झालेल्या जिज्ञासूंकडून नामजप करवून घेतला.