१. घराजवळ लावलेली तुळशीची रोपे आपोआप जळणे आणि गुढीपाडव्याला तुळशीचे रोप लावल्यावर ‘त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे
‘बर्याच दिवसांपासून आम्ही आमच्या घराजवळ लावलेली तुळशीची काही रोपे आपोआप काळी पडायची किंवा जळून जायची; पण २५.३.२०२० या गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या आईने घराजवळ तुळशीचे एक रोप लावले. तेव्हा ‘त्यातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे आम्हाला जाणवत होते. २ दिवसांनी मला या अनुभूतीशी साधर्म्य असणारी अन्य एक अनुभूती येथे दिली आहे.
२. त्रिदेवांनी साधिकेला सूक्ष्मातून दर्शन देणे आणि शिवाने तुळशीचे रोप देऊन ‘हे कुंडीमध्ये लावा’, असे सांगणे
२ अ. सूक्ष्मातून शेषनागासह श्रीविष्णु, ब्रह्मा आणि शिव या त्रिदेवांचे दर्शन होऊन कृतज्ञताभाव जागृत होणे : २७.३.२०२० या दिवशी रात्री झोपतांना मी गुरुदेवांचे स्मरण करून डोळे मिटले. थोड्या वेळातच मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘माझ्या डोक्यावर शेषनागाचा हिरा असलेला फणा होता आणि मी आश्चर्यचकित होऊन इकडे-तिकडे बघायला लागले. तेवढ्यात मला माझ्या उजव्या बाजूला श्रीविष्णु पहुडलेले दिसले. मी त्वरित उठले आणि त्यांना नमस्कार केला. श्रीविष्णू यांनी मला आशीर्वाद म्हणून ‘कमळाचे फूल’ दिले. तेव्हा तिथे ब्रह्मदेव प्रगट झाले. मी त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी मला आशीर्वादस्वरूप ‘शंख’ दिला आणि तो वाजवायला सांगितला. मी शंख वाजवताच तिथे शिव प्रगट झाले. त्रिदेवांचे दर्शन झाल्याने माझ्या मनात कृतज्ञताभाव जागृत झाला; पण मला ‘त्यांच्या चरणी कशी कृतज्ञता व्यक्त करू ?’, हे कळले नाही. तेव्हा मी पुढे काहीच न बोलता केवळ लीन होऊन त्यांच्याकडे पहात राहिले.
२ आ. त्रिदेवांनी त्यांची आयुधे प्रदान करून साधिकेभोवती संरक्षककवच निर्माण केल्याचे जाणवणे : नंतर ‘त्रिदेवांकडून माझ्याकडे आशीर्वादस्वरूप चैतन्याचा स्रोत येत आहे आणि त्रिदेव मला शक्ती प्रदान करत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा मी परत एकदा कृतज्ञता व्यक्त केली. त्रिदेवांनी माझे रक्षण होण्यासाठी मला त्यांची आयुधे प्रदान केली. आरंभी श्रीविष्णूने सुदर्शनचक्र दिल्यावर ते माझ्या डोक्यावर येऊन थांबले. ब्रह्मदेवाने मला गदा दिल्यावर ती माझ्या डाव्या बाजूला आली आणि शिवाने त्रिशूळ देताच ते माझ्या उजव्या बाजूला आले. अशा प्रकारे त्रिदेवांच्या आयुधांद्वारे माझ्या तिन्ही बाजूंभोवती संरक्षककवच निर्माण झाले.
२ इ. शिवाने तुळशीचे रोप देऊन ‘कुटुंबियांनी प्रत्येकी एक पान खा आणि हे रोप कुंडीमध्ये लावा’, असे सांगणे : यानंतर शिवाने मला तुळशीचे एक रोप देऊन सांगितले, ‘घरातील सर्वांनी या तुळशीचे प्रत्येकी १ पान खा आणि हे रोप कुंडीमध्ये लावा.’ नंतर भगवान शिवाने मला विभूती दिली आणि ‘तू ही विभूती कपाळाला लाव’, असे सांगितले.
२ ई. ‘त्रिदेवांनी मला दिलेली ती आयुधे अजूनही माझ्या बाजूला आहेत’, असे मला दिसते आणि तसे जाणवते.’
– सौ. केताली पियुष कुलकर्णी, लातूर (२९.४.२०२०)
‘कोरोना’ प्रतिबंधात्मक नामजप करतांना श्री दुर्गादेवीचे दर्शन होणे आणि ‘देवीच्या चरणांमधून चैतन्य प्रक्षेपित होऊन ते सर्वांना मिळत आहे’, असे दिसणे‘एप्रिल २०२० मध्ये मी ‘कोरोना’वरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘श्री दुर्गादेवी, दत्त आणि शिव’ या देवतांचा नामजप करत होते. तेव्हा ‘श्री दुर्गादेवी लाल रंगाची साडी नेसून नदीच्या काठावर बसली आहे आणि तिने तिचे चरण नदीमध्ये ठेवले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. तेव्हा ‘तिच्या चरणांमधून सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित होऊन ते सर्वांना मिळत आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. केताली पियुष कुलकर्णी, लातूर (२९.४.२०२०) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |