
अमृतनगर (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होते. त्यामागे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक कारणे आहेत. याउलट १ जानेवारीलाच नवीन वर्ष का ? याला कुठलाही आधार नाही. त्यामुळे नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच होय, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. अमृतनगर येथे २३ डिसेंबर २०२१ या दिवशी ‘खंडोबा देवाचे जागरण’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या प्रसंगी पू. डॉ. शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती.
प्रारंभी आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे यांनी नमस्कार कसा करावा, स्त्रियांनी कुंकू आणि पुरुषांनी टिळा लावण्याचे महत्त्व, ‘हलाल’ उत्पादने न वापरणे यांसंबंधी माहिती दिली.
विशेष
१. जिज्ञासूंनी ‘हलाल विषय’ ऐकून त्या संदर्भात पंतप्रधानांना पाठवण्यात येणार्या निवेदनावर स्वाक्षरी केली.
२. कार्यक्रमाला उपस्थित जिज्ञासूंपैकी एक सौ. सुरेखा देसाई यांनी त्यांच्या गावी आष्टा येथे ‘या संदर्भात प्रबोधनपर विषय ठेवूया’, असे सांगितले.
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !