श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भाविकांची लूट !

श्री तुळजाभवानीदेवीचे बनावट संकेतस्थळ सिद्ध करून भक्तांना गंडा घातला जात असल्याची माहिती समोर आली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या भक्तांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २१.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

भाविकांच्या विरोधानंतरही केरळमधील साम्यवादी माकप सरकारने कन्नूर येथील मत्तनूर महादेव मंदिर कह्यात घेतले !

प्रशासकीय अधिकारी टाळे तोडून मंदिरात घुसले !
प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत सत्ताधारी माकपचे कार्यकर्तेही असल्याचा भाविकांचा आरोप

माहीम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद !

माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी माहीम पोलिसांनी ७ ऑक्टोबरला रात्री उशिरा मंदिर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये देवस्थानचे विश्वस्त जयवंत देसाई, शैला पठारे, पद्माकर साहनी आणि संजीव परळकर यांना आरोपी करण्यात आले आहे

तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

मंदिरांमध्ये पुजार्‍यांची नियुक्ती, ही धर्मशास्त्रानुसार झालेली आहे. त्यात पालट करण्याचा अधिकार सरकारला नाही. वर्ष १९७२ पासून तमिळनाडूमधील मंदिरांविषयी उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय यांच्याकडून अनेक आदेश हिंदूंच्या बाजूने आहेत.

राज्य संरक्षित स्मारकांमध्ये समावेश असलेल्या माहिम (मुंबई) येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील २३६ वर्षांपूर्वीच्या मूर्ती गायब !

चौकशी अहवालात सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाने विश्वस्तांवर गंभीर मते नोंदवूनही पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ !

देवनिधी लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना वर्षभरानंतर तुळजापूर पोलिसांनी अटक केली, एवढेच पुरेसे नाही.

मध्यप्रदेशातील शंकरपूर येथील सरकारीकरण केलेल्या मंदिराची भूमीची अवैध विक्री !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केवळ मध्यप्रदेशच नव्हे, तर भारतात ठिकठिकाणी मंदिरांची भूमी अशा प्रकारे लाटण्यात येत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे सरकारीकरण रोखणे आवश्यक !

(म्हणे) ‘तमिळनाडूतील मंदिरातील सोने बँकेत ठेवून त्यातून येणार्‍या व्याजाची रक्कम मंदिरांच्या पायाभूत सुविधांसाठी वापरली जाईल !’  पी.के. सेकरबाबू

‘मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण करून त्यांच्या पैसा पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा विचार धर्मनिरपेक्ष सरकारकडून का केला जात नाही ?’ या प्रश्‍नाचे उत्तर द्रमुक सरकार देणार का ?

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

मंदिरांचे सरकारीकरण करून मनमानी पद्धतीने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेणार्‍या  तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा निषेध ! तमिळनाडूतील हिंदूंनी या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !