राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २१.१०.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे)  आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला.’


महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

‘सध्या प्रतिदिन १४ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्यांचा प्रभाव महिला अन् मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते. ‘लव्ह जिहाद’चे संकट तर आता दारापर्यंत येऊन पोचले आहे. हे सर्व रोखण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. यासाठी समितीच्या वतीने विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणही दिले जाते. सर्व हिंदु भगिनींनी यात सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा !’


देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. वर्ष १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करत देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले. जगात १५७ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्यूंचे राष्ट्र आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’


धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांकडून चर्च भरलेले असतात. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’ (संदर्भ : संकेतस्थळ)


सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

‘मंदिरे सरकारच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे होय.’

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर.

(साभार : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)