साधकांकडून सहजपणे साधना करवून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी साधिकेने केलेले आत्मनिवेदन !

सद्गुरु राजेंद्रदादानी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून केलेले साहाय्य आणि दिलेले ज्ञानामृत शब्दांत मांडणे अशक्य आहे; परंतु त्यांनी केलेल्या फूलरूपी साहाय्यातील ही लेखरूपी एक पाकळी….

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना ‘सद्गुरु’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !  

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि अखंड ईश्वरी अनुसंधानात असलेले पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याचे आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आले. त्यांचे एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

पू. दीक्षितआजोबा यांच्या देहत्यागाची स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली पूर्वसूचना आणि पू. वामन यांनी ‘पू. आजोबा नारायणाकडे (परात्पर गुरु डॉक्टरांकडे) गेले’, असे सांगणे

पहाटे मला स्वप्नात दिसले, ‘एका ठिकाणी पुष्कळ साधक एकत्रित झाले आहेत . . . ‘ही कुणाच्या अंत्यविधीची सिद्धता चालू आहे ?’ हे पाहून मला भीती वाटली नाही. अंत्यविधीचे दृश्य असूनही मनाला चांगले वाटत होते. यावरून मला वाटले, ‘ते एखाद्या उन्नतांच्या अंत्यविधीची सिद्धता करत आहेत.’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या कार्यालयात सेवेसाठी गेल्यावर संभाजीनगर येथील अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना आलेल्या अनुभूती

सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज नारळी पौर्णिमा (३.८.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अधिवक्ता उमेश भडगांवकर यांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत.

साधनेच्या बळावर आपत्काळाला सहजतेने सामोर्‍या जाणार्‍या पू. माई !

‘प.पू. दास महाराज सूक्ष्मातील वाईट शक्तींशी लढा देण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले आहेत, तर पू. (सौ.) माई स्थूल देहाने आश्रमातील नित्यक्रम करत असतात आणि सूक्ष्म देहाने श्रीगुरुचरणी लीन होऊन साधना करतात’, असे आम्हाला जाणवते.

‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर सिद्ध करणार्‍या सद्गुरु (सौ.) सखदेवआजी !

वर्ष २०१५ मध्ये पू. सखदेवआजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना उपाय करण्यासाठी नामजप, न्यास आणि मुद्रा शोधत. त्या वेळी पू. आजींनी शोधलेले उत्तर आणि मी शोधलेले उत्तर ९० टक्के वेळा एकच असे. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर प्रकर्षाने सिद्ध होते.

पू. वामन राजंदेकर (वय १ वर्ष ११ मास) आणि त्यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून  पृथ्वीवर जन्माला आलेली बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय ९ वर्षे) यांच्यातील आध्यात्मिक स्तरावरील दैवी नाते !

फोंडा (गोवा) येथील पू. वामन राजंदेकर आणि त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर यांच्यात भावा-बहिणीचे कौटुंबिक नाते नसून आध्यात्मिक नाते आहे. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आईने त्यांच्यातील अशा या आगळ्या-वेगळ्या नात्यातील उलगडलेले विविध पैलू इथे प्रस्तुत करीत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भ्रमणभाषमधील दैनिक ‘सनातन प्रभात’चे नूतन ‘अ‍ॅप’ दाखवतांना साधकाने अनुभवलेली त्यांची सर्वज्ञता !

‘प.पू. गुरुदेवांना ‘सनातन प्रभात’चे अंतिम टप्प्यातील नूतन Android Mobile App एका साधकाने दाखवले. परात्पर गुरुदेव स्वतः भ्रमणभाष वापरत नाहीत, तरीही भ्रमणभाषमधील ‘अ‍ॅप’ बघतांना त्यांनी निवडक प्रश्‍न विचारले. त्यांचे प्रश्‍न तांत्रिक होते.

‘अतिथी’ म्हणून नव्हे, तर ‘एक कुटुंबीय’ म्हणून सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे सद्गुरु सिरियाक वाले यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पुण्यातील साधक श्री. प्रताप कापडीया यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

१७ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली आणि प.पू. फडकेआजी यांनी जतन केलेली शेवंतीची २ फुले म्हणजे गुरुचरणांवर अर्पिलेले साधकजीवच !

११ डिसेंबर २००२ या दिवशी कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांनी श्रीमती फडकेआजी (आताच्या प.पू. फडकेआजी) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली २ फुले दिली.