
नमन माझे आपल्या ‘श्री’ चरणी सद्गुरु जाधवकाका ।
‘सनातनच्या दिव्य देवभूमीचा आहात आपण तेजस्वी तारा ।
केलेत सर्वस्वही अर्पण या धर्मकार्याला ।
नमन आमचे आपल्या ‘श्री’ चरणी सद्गुरु जाधवकाका ॥ १ ॥
धर्मप्रसाराचे शिवधनुष्य धारण करूनी ।
पुढे घेऊन जाता गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा वसा ।
देवालाही कौतुक वाटे असा प्रेमळ सत्संग आपला ॥ २ ॥
भाग्य लाभले सर्वांना, आहे ही गुरुदेवांचीच कृपा ।
मिळते आपले अखंड मार्गदर्शन नित्य आम्हा ।
आपण घडवल्या साधकांच्या अनेक पिढ्या ॥ ३ ॥
व्यक्तीमत्त्वात आपल्या भासे सूर्याचे तेज ।
परी वाणीमध्ये आपल्या चंद्राची असे शीतलता ।
शब्दसुमने ऐकून आपली, होतो भाव जागृत आमचा ॥ ४ ॥
सद्गुणांची आहात खाण तुम्ही ।
गुरुदेवांचे प्रतिबिंबच भासता ।
प्रेमळ मार्गदर्शनाने साधकांना कृतीतून तुम्ही घडवता ॥ ५ ॥
आपण साक्षात् आहात वात्सल्यमूर्ती ।
सहवासात आपल्या लाभे आनंद आणि शांती ।
गुरुतत्त्वाची साक्ष मिळे तुमच्यामध्ये साधकांना ॥ ६ ॥
साधकांचे आध्यात्मिक कष्टही नष्ट करता ।
आपल्या आशीर्वादाने साध्य होई सर्वांची साधना ॥ ७ ॥
आपल्या संतत्वाची अगम्यता ।
सुटतात साधकांच्या साधनेतील सर्व समस्या ।
आपल्या अंतःकरणी वाहे प्रीती आणि निरपेक्षतेचा झरा ॥ ८ ॥
प्रेमळ शब्दांत तुम्ही चुकांची जाणीव करून देता ।
साधकांना आधार वाटे भक्कम आपला ।
प्रसंगी गंमत-जंमत करूनी वातावरणाचा तुम्ही समतोलही राखता ॥ ९ ॥
गाता जेव्हा तुम्ही गुरूंची महती ।
सर्वत्र भावभक्तीच्या छटा उमटून येती ।
सर्वांना जणू भावसागरात बुडवता तुम्ही ॥ १० ॥
लाभले तुमच्यासारखे सद्गुरु आम्हाला ।
व्हावी अखंड साधना, हीच वारंवार प्रार्थना ।
नमन आमचे आपल्या ‘श्री’ चरणी सद्गुरु जाधवकाका ॥ ११ ॥
परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने वरील काव्य सुचले. गुरुमाऊली आणि सद्गुरु जाधवकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– अधिवक्ता चारुदत्त जोशी आणि सौ. अनिता जोशी, संभाजीनगर (३०.५.२०२०)
सद्गुरु नंदकुमार जाधवकाका असती आमची प्रेमळ सद्गुरु माऊली ।

सर्व साधकांची प्रेमळ अन् मायेची सावली ।
तीच आहे आमची सद्गुरु माऊली ॥ १ ॥
साधकांसाठी जणू प्रीतीचा खळाळता झरा ।
तोच आहे गुरुमाऊलीच्या सद्गुरूंमधील हिरा ॥ २ ॥
निरपेक्षता आहे ज्यांचा अनमोल गुण ।
ते पाहूनी गुरुमाऊलीने दिले संतरत्न आपणहून ॥ ३ ॥
ज्यांची प्रत्येक सेवा आहे भावपूर्ण अन् परिपूर्ण ।
म्हणूनच ‘नंदकुमार’ आहे त्यांचे नाव अर्थपूर्ण ॥ ४ ॥
ज्यांचे हास्य मधुर अन् मनमोहक रूप ।
ते पाहून मनात उमटत रहाते गुरुमाऊलीचे प्रतीरूप ॥ ५ ॥
ज्यांची वाणी आहे सुरेल आणि गातात अवीट गोडगीत ।
म्हणूनच ते गाऊ शकतात गुरुमाऊलीसाठी भावगीत ॥ ६ ॥
ज्यांना आहे तळमळ साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची ।
जणू प्रत्येक जिवाला बनवायचे आहे मोरपीस श्रीकृष्णाच्या मुकुटातील ॥ ७ ॥
अखंड प्रीती असे ज्यांच्या हृदयात ।
तसेच उमटती प्रतिबिंब गुरुमाऊलीच्या चरणपादुकांत ।
– सौ. अक्षरा दिनेश बाबते, संभाजीनगर (३०.५.२०२०)
परात्पर गुरुमाऊलीने दिधली सद्गुरु जाधवकाकांच्या रूपात मायमाऊली ।

कृतज्ञतेच्या पुष्प ओंजळी किती वाहू तव चरणी ।
दिधली तुम्ही आम्हाला श्री गुरूंचीच कृपासावली ॥ १ ॥
घडवण्या साधका करी प्रयत्न रात्रंदिन ।
वाढवण्या गुरुकार्य करती प्रयत्न विसरूनी देहभान ॥ २ ॥
मधुर हास्य तुमचे, करिती वर्षाव आनंद अन् चैतन्य यांचा ।
प्रेमळ वाणीने होता आधार आम्हा सर्व लेकरांचा ॥ ३ ॥
गाता भजन तुम्ही, होतो दंग आम्ही ।
‘याची देही, याची डोळा’ पहातो तुमच्यात ज्ञानोबा-तुकोबा माऊली ॥ ४ ॥
गुरुभक्तीचा महिमा रुजवता सर्वांच्या अंतरी ।
कोटीशः कृतज्ञ आम्ही परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी ।
ज्यांनी दिधली आम्हा सद्गुरु जाधवकाकांच्या रूपात मायमाऊली ॥ ५ ॥
– कु. प्रियांका लोणे, संभाजीनगर (३०.५.२०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |