गुरुकार्याची तळमळ आणि निरपेक्ष प्रीती यांचा संगम असलेले सनातन संस्थेचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !

२७.३.२०२४ या दिवशी सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

गुरुकृपेने संत वडील लाभल्याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

माझा जन्म केवळ साधनेसाठीच झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी योग्य वेळी मला त्यांच्याजवळ घेऊन साधनेची योग्य दिशा दिली आहे; पण या सर्वांचे मुख्य कारण पू. आबांची साधना आहे !

इतरांचा विचार करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सतत स्मरण करणार्‍या सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) !

‘२४.१२.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी देहत्याग केला. २१.३.२०२४ या दिवशी त्यांचे त्रैमासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांच्या मुलीला त्यांच्या रुग्णाईत स्थितीत जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांनी दिलेली अमूल्य शिकवण !

प.पू. फडकेआजी आम्हाला समजवायच्या, ‘‘लोकांकडे किती लक्ष द्यायचे, हे आपण ठरवायचे. त्यांना काहीही बोलू दे. देवाला सगळे ठाऊक आहे ना ?’’ देवावरील दृढ श्रद्धेमुळे त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोर्‍या गेल्या.

GlobalSpiritualityMahotsav : ‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक कमलेशजी पटेल यांना ‘ग्लोबल अ‍ॅम्बॅसॅडर ऑफ पीस बिल्डिंग अँड फेथ’ पुरस्कार प्रदान !

एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठीचे निकष हे अतार्किक होते. काळ पालटला आहे. आज सर्व नागरी पुरस्कार हे वस्तूनिष्ठ निकषांवर आधारित असतात.

सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला उत्कट आणि समर्पित भाव !

१५.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात प.पू. फडकेआजी यांची साधना आणि सेवा यांसाठी असलेली तीव्र तळमळ पाहिली. आजच्या भागात ‘त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती समर्पित अन् उत्कट भाव कसा होता ?’ ते दिले आहे.

साधकांवर मातेसम प्रीती करून त्यांना घडवणार्‍या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर (वय ४६ वर्षे) !

एखाद्या साधकाकडून योग्य पद्धतीने कृती होत नसल्यास पू. ताई त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे त्या साधकाला त्यांचा आधार वाटतो आणि साधकाचा सेवा करण्यासाठी उत्साह वाढतो.

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी धर्मनिष्ठता आणि लढाऊ वृत्ती यांद्वारे सतत लढणारे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.

चैतन्याचा अखंड प्रसार करणारे सनातनचे अनमोल रत्न परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.

साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना घडवणार्‍या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पू. मनीषाताई, म्हणजे प्रेमभाव, भाव आणि भक्ती यांचा अथांग सागरच आहे.त्यांच्या मधुर वाणीतील शब्द मधाप्रमाणे गोड असून ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.पू. ताई घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांमुळे माझी व्यष्टी साधना भावपूर्ण होऊन मला त्यातून आनंद घेता येत आहे.