सद्गुरु राजेंद्रदादा, तुम्ही जे आम्हाला देत आहात ।
त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत ॥ धृ. ॥
लढाऊवृत्तीचे धडे तुम्ही आमच्याकडून गिरवून घेत आहात ।
षडरिपूंच्या जंजाळातून तुम्हीच आम्हाला अलगद बाहेर काढत आहात ॥ १ ॥
अहंच्या मायावी युद्धात घायाळ झाल्यावर ।
आमच्यावर निरपेक्ष प्रेमाची फुंकर घालून ।
तुम्हीच आम्हाला नवीन उत्साह देत आहात ॥ २ ॥
‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ (टीप १) असतांना ।
आपण गुरुप्रीतीचे कृपाछत्र आमच्यावर धरत आहात ।
मनावर विजय मिळवण्यासाठी तुम्हीच आम्हाला शिकवत आहात ॥ ३ ॥
‘कृतज्ञता’ शब्दाचा भावार्थ तुम्ही आम्हाला शिकवत आहात ।
कृतज्ञताभावाची प्रत्यक्ष अनुभूती तुम्हीच आम्हाला देत आहात ।
‘कृतज्ञताभावनिर्मितीच्या ऋणा’तून मुक्त होण्यासाठी ।
तुम्हीच आम्हाला साधनारत करत आहात ॥ ४ ॥
टीप १ – ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगातून साधना होण्यासाठी प्रयत्न करणे, ध्येयाच्या दृष्टीने मनाला सतत जागृत ठेवणे, त्याच वेळी अनुसंधानात रहाण्यासाठी देवाला आळवणे आणि सेवा परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत रहाणे’, हे सर्व करत असतांना स्वभावदोष अन् अहं यांमुळे मनाला संघर्षरूपी युद्धाला सतत सामोरे जावे लागते.
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |