आज कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (२१.११.२०२०) श्री चंद्रशेखरानंद पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…
परमहंस चंद्रशेखरानंद ।
शिष्य तयांचे साईश अनंतानंद ।
एकची ते भक्तराज नि तयांचे शिष्य रामानंद ।
अशा या गुरुपरंपरेला वंदन करूया ॥ १ ॥
मुकुटमणी ‘जयंतावतार (टीप १)’ ।
घडवली संतरत्ने शतकांवर ।
नरजन्माचा होण्या उद्धार ।
गुरुकृपायोग अनुसरूया ॥ २ ॥
नामजप, सत्संग, सत्सेवा साधन ।
तन, मन, धन अन् अहं त्यागून ।
आनंदासह प्रीतीची होण्या उधळण ।
भक्तीची भीक मागूया ॥ ३ ॥
संत अन् सद्गुरु करिती मार्गदर्शन ।
करवून घेती स्वभावदोषांचे निर्मूलन ।
स्वयंसूचना मनास देऊन ।
स्वभावदोष-अहंशी लढूया ॥ ४ ॥
कलियुगी नामजप हे साधन ।
थोर असे हे संतांचे वचन ।
येता-जाता आणि बसून ।
स्मरणी अनुसंधान ठेवूया ॥ ५ ॥
विविध प्रसंगी शिकून ।
ध्यानीमनी करू गुरुपादुकापूजन ।
प्रार्थना करून अन् कृतज्ञ राहून ।
शरणागती ती वाढवूया ॥ ६ ॥
स्वतःच्या चुका समस्त जना सांगून ।
अहंच्या पैलूंसह त्या फलकावर लिहून ।
करण्या पापांचे परिमार्जन (टीप २) ।
स्वयंशिस्त अंगी बाणवूया ॥ ७ ॥
‘भाव तेथे देव’ ही उक्ती ।
भावजागृती साधे नवविधाभक्ती ।
भावासह करूनी कर्म अन् कृती ।
कर्मफलाची आसक्ती सोडूया ॥ ८ ॥
सात्त्विक अत्तर अन् भीमसेनी कापूर लावून ।
काढू स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण ।
क्षमायाचनेसह आत्मनिवेदन करून ।
शुद्ध, पवित्र नि सात्त्विक होऊन हलकेपणा अनुभवूया ॥ ९ ॥
श्वासोच्छ्वासी अन् क्षणोक्षणी ।
सत्सेवा अन् साधनेची लिहू दैनंदिनी ।
गुरुलीला गाऊनी मार्गक्रमणी रामनाथी आश्रमात जाऊया ॥ १० ॥
रामनाथीला असे परमेश्वर ।
हरिहर असती आपले गुरुवर ।
जिवा-शिवाचे होण्या मीलन ।
साकडे तयांना घालूया ॥ ११ ॥
आकाशवाणी करण्या महर्षि तत्पर ।
श्रीसत्शक्ति अन् श्रीचित्शक्ति यांसह ।
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले ।
मोक्ष देण्या (टीप २) साधका या भारतभूवरी अवतरले ॥ १२ ॥
श्रीसत्शक्ति अन् श्रीचित्शक्ति शिष्या देवीसमान ।
रवि-शशीसम असती त्या प्रकाशमान ।
करण्या ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन ।
तयांचे आशीर्वाद मागूया ॥ १३ ॥
स्वेच्छा सोडून परेच्छेने वागून ।
ईश्वरेच्छा कळे विश्वमन अन् विश्वबुद्धीतून ।
साधनेतील मर्म हे जाणून ।
गुरूंचे आज्ञापालन करूया ॥ १४ ॥
हे न लिहिले मी, ‘मी’ असे मूढ अजाण ।
लिहिणारे अन् लिहून घेणारे खचित आपण ।
द्यावे साधका तव चरणी स्थान ।
एकची मागणे गुरुरायांच्या चरणी ॥ १५ ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्री महाविष्णूचा अवतार ‘जयंतावतार’ आहेत, असे महर्षींनी नाडीवाचनात सांगितले आहे.
टीप २ – ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे तीन गुरु साधकांना मोक्षप्राप्ती करून देण्यासाठी भारतभूमीवर अवतरले आहेत’, असे महर्षींनी नाडीवाचनामध्ये सांगितले आहे.’
– सौ. मोहिनी चितळे, बिबवेवाडी, पुणे. (१०.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |