तोतया पोलीस अधिकार्‍याकडून गायकाची अडीच लाखांची फसवणूक !

संगीत कार्यक्रम सादर करण्यासाठी ८ लाख रुपये देण्याचे आमीष दाखवून गायक अशोक निकाळजे यांची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पातूर (जिल्हा अकोला) येथे मृत युवकाला जिवंत केल्याचा बनाव पोलिसांनी हाणून पाडला !

पातूर तालुक्यातील विवरा गावातील प्रशांत मेसरे या युवकाचा अंत्यसंस्कार होत असतांनाच तो तिरडीवर उठून बसला होता; मात्र हा केवळ भोंदूगिरीचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून वाटाण्याच्या अक्षता !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ ! भरमसाठ तिकीटदर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचे जनविरोधी रूप उघड !

तिकीट बुकींग केंद्रांवर शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा !

‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

संभाजीनगर येथे एस्.टी गृहनिर्माण संस्थेत ८ लाखांचा अपहार !

एस्.टी. मध्यवर्ती कार्यशाळा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालमत्तेची परस्पर खरेदी-विक्री करून तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांनी संस्थेत ८ लाख रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी या दोघांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खोटी देयके सिद्ध करून महावितरणची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

‘मराठवाडा रेल कोच फॅक्टरी’साठी नवीन ३३ केव्ही लाईनच्या कामासाठी साहित्य खरेदी करण्यात आले होते. याची बनावट देयके सिद्ध करून महावितरणला देण्यात आली होती. ही देयके नंतर सरकारकडे संमतीसाठी पाठवण्यात आली होती.

कर्जासाठी बनावट शिक्का मारून आणि स्वाक्षरी करून ग्रामपंचायतीची फसवणूक करणार्‍यांवर गुन्हा नोंद !

फसवणूक करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे समाजासाठी घातक आहे. फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी. समाजाची नीतिमत्ता वाढण्यासाठी धर्मशिक्षणच द्यायला हवे.

दहा रुपयांची फसवणूक केल्यामुळे ग्राहकाला १५ सहस्र रुपये देण्याचा जिल्हा ग्राहक मंच (सिंधुदुर्ग)चा वीज वितरणला आदेश

वीज वितरण आस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात यशस्वी लढा देणारे ओरोस येथील विष्णुप्रसाद दळवी यांचे अभिनंदन ! ग्राहकांना विविध कारणांनी वेठीस धरणार्‍या वीज वितरण आस्थापनाला हा मोठा धक्का आहे !

विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यामुळे सोलापूरवासियांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

तांत्रिक माहिती नसतांना ‘व्हर्चुअल’ गुंतवणूक केल्याने लोकांना फटका बसत आहे, अशी माहिती नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील तज्ञ देत आहेत. अपकीर्तीच्या भीतीने अनेक जण समोर येऊन तक्रार द्यायला घाबरत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक करणार्‍यांचे फावत आहे.

ठेकेदार ‘यशोधरा संस्थे’ला ९९ सहस्र रुपयांचा दंड !

या संस्थेस ७० ग्रॅमचा १ लाडू याप्रमाणे २ लाडू पॅकिंग करून १४० ग्रॅम वजन असणे बंधनकारक करण्यात आले होते; मात्र संस्थेने यापेक्षा अल्प वजनाचे लाडू सिद्ध करून मंदिर समितीला विक्रीसाठी दिले.