खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्या रंगांमधील घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण ठरवणार ! – नरहरी झिरवाळ, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री
विक्री होणार्या खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणार्या विविध रंगांमधील घातक घटकांविषयी चर्चा करून खाद्यरंगांविषयीचे धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. त्यात विधानसभेतील या क्षेत्रातील जाणकार सदस्यांना निमंत्रित केले जाईल.