मुंबईत येणार्‍या दुधाच्या ९८ वाहनांची पडताळणी !

  • अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई !

  • अल्प गुणवत्तेचे दूध आढळलेले वाहन परत पाठवले

मुंबई – अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसांत मुंबईत प्रवेश करणार्‍या दुधाच्या एकूण ९८ वाहनांची पडताळणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ६ सहस्र ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ सहस्र ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची पडताळणी करण्यात आली. मानखुर्द येथे पडताळणीच्या वेळी  अल्प दर्जाचे दूध आढळून आले. त्यामुळे दुधाचे एक वाहन परत पाठवण्यात आले, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.