हिंदूंनो, सण साजरे करण्‍यामागील उद्देश लक्षात घ्‍या !

देवतांची कृपादृष्‍टी संपादन करणे. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्‍यांनी जीवन वेचले, अशा संत-महात्‍म्‍यांचे कार्य आणि त्‍यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्‍मरण ठेवणे अन् त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करणे.

Diwali : बलीप्रतिपदा : विक्रम संवत्‍सराचा ‘वर्षारंभ दिन’ !

कार्तिक शुक्‍ल प्रतिपदा हा दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्‍हणून ओळखला जातो. हा दिवस विक्रम संवत्‍सराचा ‘वर्षारंभ दिन’ मानला जातो. म्‍हणूनच या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ म्‍हणतात. व्‍यापारी लोक या दिवसापासून नवे ‘व्‍यापारी वर्ष’ चालू करतात.

Diwali : बलीप्रतिपदेच्‍या दिवशी दिले जाते दीप आणि वस्‍त्रे यांचे दान !

बलीप्रतिपदेच्‍या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्‍याची पत्नी विंध्‍यावली यांची चित्रे काढून त्‍यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्‍यर्थ दीप आणि वस्‍त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्‍यंगस्नान केल्‍यावर स्‍त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.

लांजा येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ उपक्रम

हिंदु सकल समाजाच्या वतीने ‘नरकचतुर्दशीच्या’ रात्री ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम ‘सेल्फी पॉईंट’च्या  स्वरूपात साकारण्यात आला होता.

‘एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी’ अभियान

दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.

भाऊबिजेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

उद्या १४ नोव्‍हेंबरला असलेल्‍या बलीप्रतिपदेच्‍या निमित्ताने…

बळीराजाच्‍या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्‍वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्‍याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्‍हणजे शरणागती !

साधनेसाठी पूरक ठरणार्‍या दीपावलीचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ घ्‍या !

भगवान श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध करून प्रजेला आनंद दिला, तो दिवस नरकचतुर्दशी ! आपल्‍यातील स्‍वभावदोष आणि अहं या नरकासुररूपी वृत्तीचे निर्मूलन करण्‍यासाठी गुरुमाऊलीने स्‍वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. ही प्रक्रिया गांभीर्याने राबवून त्‍यापासून मुक्‍त होण्‍यातील आनंद अनुभवूया.