IndianExpress Hurting Sentiments Of HINDUS : ‘करवा चौथ’चे विकृतीकरण केल्यावरून दैनिक ‘इंडियन एक्सप्रेस’कडे तक्रार !

दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी केली तक्रार !

(‘करवा चौथ’ म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीने निर्जल राहून केलेले व्रत)

नवी देहली : उत्तर भारतीय हिंदू साजरा करत असलेल्या ‘करवा चौथ’ या व्रताचे दैनिक ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने विकृतीकरण केले. या वृत्तपत्राने १८ ऑक्टोबरला ‘करवा चौथ’चा उपवास करणार्‍या महिलांच्या संप्रेरकांवर नकारात्मक परिणाम होतो’, अशा आशयाची बातमी वृत्तपत्राने प्रसारित केली होती. यावरून देशभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठांनी वृत्तपत्राचा निषेध करत त्याचा हिंदुद्वेष्टा चेहरा उघडा पाडला. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’कडे लेखी तक्रार केली आहे.

या वृत्तपत्राने या वर्षी ११ मार्चला रमझानच्या ‘रोज्यां’मुळे (उपासामुळे) वजन अल्प होणे, तसेच रक्तातील साखर अन् कोलेस्ट्रॉल यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते’, अशा आशयाचा मथळा देऊन बातमी प्रसारित केली होती. धर्मप्रेमी हिंदूंनी या दोन्ही बातम्यांचा संदर्भ देत ‘इंडियन एक्सप्रेस’चा हिंदुद्वेष्टा नि पक्षपाती चेहरा उघडा पाडला.

यावरून अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला अधिकृत ई-मेल करून ‘इंडियन एक्सप्रेस’चे तक्रार निवारण अधिकारी हृतिक शांडिल्य यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीत सचदेवा यांनी म्हटले की, करवा चौथवरील बातमीतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या असून त्यातून भारतीय न्याय संहिता, तसेच माहिती तंत्रज्ञान नियम २१ आणि ‘प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया कायदा, १९७८’ यांचे उल्लंघन होते. त्यामुळे ‘इंडियन एक्सप्रेस’ने यावरून विनाअट सार्वजनिक क्षमा मागितली पाहिजे आणि पत्रकारितेच्या नियमांनुसार स्पष्टीकरणही दिले पाहिजे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mews.in (@mewsinsta)

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍यांविरुद्ध तत्परतेने कृती करणार्‍या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! असे धर्मप्रेमी हीच सनातन धर्माची खरी शक्ती आहे !