ही आहे काँग्रेसची शेतकर्यांप्रतीची भावना !
हावेरी (कर्नाटक) – भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे ऊस विकास आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे. मंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विरोधकांनीही काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. यापूर्वी पाटील यांनी ‘कर्नाटक सरकारने मृत शेतकर्यांच्या कुटुंबियांसाठी भरपाई वाढवल्यापासून राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या झपाट्याने वाढत आहेत’, असे विधान केले होते.
पाटील यांना मंत्रीमंडळातून तात्काळ काढून टाकावे, अशी मागणी शेतकर्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. एवढे होऊनही पाटील यांनी मात्र ‘मी शेतकर्यांच्या भावना दुखावणारे कोणतेही वक्तव्य केले नाही’, असे सांगितले.