नागपूर येथील शेतकर्‍याच्या आत्महत्या प्रकरणी ४ मासांनी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद !

गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – जिल्ह्यातील आमगाव देवळी येथील शेतकरी राहुल गोमासे यांनी काही जणांनी मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून १२ मार्च या दिवशी शेतातील बांधावर गळफास लावून आत्महत्या केली होती. या संदर्भात पोलीस कारवाई करत नसल्याने पीडितेने गृहमंत्र्यांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी ४ महिन्यांनंतर ६ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

आत्महत्येपूर्वी राहुल यांनी पत्नी जयश्री यांच्या भ्रमणभाषवर २० ते २५ संदेश पाठवून त्यामध्ये काहींनी मानसिक त्रास दिल्याचे म्हटले होते. दत्तू गोमासे यांची वायफळ रिठी येथे ३.६६ हेक्टर शेती होती. सचिन लकडे आणि सुरेंद्र शेंडे यांच्यासमवेत भूमीच्या आर्थिक व्यवहारात त्याला गुंतवून गावातील मानसिक त्रास देण्यात येत होता. गोमासे यांना अनेकदा पैशांचीही मागणी होत होती.

संपादकीय भूमिका

  • सामान्य जनतेची तक्रार नोंद न करून घेणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद केला पाहिजे !
  • आत्महत्येसारख्या गंभीर प्रकरणातही पोलीस असे वागतात, तर सामान्य गुन्ह्यांच्या संदर्भात कसे वागत असतील ?