मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – नागपूर विभागात ९५७, अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, तर मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली. राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आले आहे. वेळेअभावी या प्रश्नावर सभागृहात चर्चा होऊ शकली नाही. सततचा अवकाळी पाऊस, गारपीट, नापीक भूमी यांमुळे शेतकरी कर्जबाजारी आहेत असल्याचे सूत्र तारांकित प्रश्नात उपस्थित केले होत. यामध्ये तथ्य असल्याचे लेखी उत्तर मंत्र्यांनी दिले.