छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

छत्रपती संभाजीनगर – जिल्‍ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्‍यांनी आत्‍महत्‍या केली आहे. दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. हतनूर येथील दिनकर बिडवे (वय ४८ वर्षे), फुलंब्री तालुक्‍यातील कारभारी माणिकराव पाटोळे (वय ५५ वर्षे) आणि वैजापूर तालुक्‍यातील अरविंद मतसागर (वय ४३ वर्षे) असे आत्‍महत्‍या करणार्‍या शेतकर्‍यांची नावे आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्‍यांनी आत्‍महत्‍या केली आहे.