छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील पाचोड येथील अल्पभूधारक शेतकरी नारायण सरोदे (वय ४५ वर्षे) यांच्याकडे ३ एकर शेती असून त्यांनी शेतात कपाशी आणि तूर पिकांची लागवड केली; मात्र पुरेशा पावसाअभावी पिके वाळून गेली. शेतीसाठी केलेला व्ययही भरून निघाला नाही. त्यामुळे हे घेतलेले कर्ज कसे फेडायचे ? या विवंचनेतूनच त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
संपादकीय भूमिका :केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्यांपर्यंत पोचत नाहीत का ? कि आणलेल्या योजना पुरेशा नाहीत, हेही पहाणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! |