(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे जाणा !

जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना ‘मुसलमानांशी भेदभाव होत असल्याने भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित व्हा’, असे हिंदुद्वेषी आवाहन केले आहे.

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवणार !

अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू केला आहे. अमेरिका ज्या प्रमाणे याकडे गांभीर्याने पहाता आहे, ते पहाता भारतियांनी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे !

अमेरिका मित्रराष्ट्रांनाही ‘व्हेंटिलेटर्स’चा पुरवठा करणार ! – डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिका मोठ्या प्रमाणावर ‘व्हेंटिलेटर्स’ बनवणार आहे. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करूच, तसेच कोरोनाच्या विरोधातील लढ्यामध्ये आमच्या मित्रराष्ट्रांनाही आवश्यकतेप्रमाणे ‘व्हेंटिलेटर्स’चा पुरवठा करू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !

देहलीतील दंगलीविषयी वक्तव्य करणार्‍या इराणला भारताने फटकारले !

हिंदूंनो, जगातील इस्लामी देश त्यांच्या धर्मियांच्या बाजूने लगेच संघटित होऊन आवाज उठवतात; मात्र हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारा जगात एकही देश नाही, हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृतीशील व्हा ! भारताने इराणला केवळ फटकारणे पुरेसे नाही, तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला हवे !