लडाख येथील सीमेविषयीच्या कराराचे चीनकडून उल्लंघन होत आहे ! – भारत

भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे ! – संपादक

भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर

म्यनिच (जर्मनी) – भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील सीमेच्या संदर्भात झालेल्या कराराचे पालन चीनकडून केले जात नाही. भारताचे चीनसमवेत असलेले द्विपक्षीय संबंध सर्वांत कठीण काळातून जात आहेत, असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री  एस्. जयशंकर यांनी येथील सुरक्षा परिषदेत केले.

जयशंकर पुढे म्हणाले की, वर्ष १९७५ पासून अनुमाने ४५ वर्षे भारत आणि चीन यांच्या सीमेवर शांतता होती. सीमा व्यवस्थापन स्थिर होते. सैनिकी जीवितहानी झाली नाही; मात्र आता तसे घडतांना दिसत नाही. भारताने चीनशी सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनात न करण्याचा करार केला होता; परंतु आता चीनच या कराराचे उल्लंघन केले.