बंगालच्या जादवपूर विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्याचा दुसर्‍या मजल्यावरून खाली पडून मृत्यू

विश्‍वविद्यालयात विद्यार्थी शिकण्यास येतो. तेथे त्याच्यावर नैतिकतेच्या शिक्षणाने योग्य संस्कार करून तो आदर्श नागरिक बनेल, हे पहाणे आवश्यक असते; मात्र अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद आहे. यातून विश्‍वविद्यालयांची स्थिती उघड होते !

अल्पसंख्यांक मंत्रालयाने उघड केला १४४ कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा !

या घोटाळ्यासाठी उत्तरदायी असलेल्या सर्व अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून याचे पैसे वसूल करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या शाळा समुपदेशकाविनाच !

शिक्षण विभागाकडून ३२ मानसोपचार समुपदेशकांची नेमणूक करण्‍यात येणार आहे. महापालिकेच्‍या १०५ प्राथमिक शाळांमध्‍ये ४० सहस्र, तर १८ माध्‍यमिक विद्यालयांत ८ सहस्रांवर विद्यार्थीसंख्‍या आहे.

स्त्रीद्वेषाचा पुरस्कार करणार्‍या तालिबानी कायद्यांमागील प्रेरणा इस्लाममधून मिळते ! – तस्लिमा नसरीन

तालिबानने आता इयत्ता तिसरीनंतर मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध लादला आहे. उंच झालेल्या आणि १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले जात नाही. तालिबानला महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य, एकता आणि शक्ती यांची भीती वाटते.

सातारा जिल्‍ह्याला विद्यार्थ्‍यांच्‍या गणवेशासाठी सहा कोटी रुपये !

राज्‍य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्‍यांना गणवेश, बूट आणि पायमोजे वितरणासाठी सातारा जिल्‍ह्यास अनुमाने ६ कोटी ८३ लाख रुपये दिले आहेत. केंद्रशासनाच्‍या ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत ही योजना राबवण्‍यात येत आहे.

गोव्‍यात पायाभूत स्‍तरावरील शिक्षण मातृभाषेतून द्यावे !

प्राथमिक अध्‍ययन स्‍तरावर मुलांना मातृभाषेचे वाचन, लेखन शिकवणे सर्वार्थाने योग्‍य आहे. याचा गोवा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि सर्व शैक्षणिक संस्‍थांना पायाभूत शिक्षण मातृभाषेतून देण्‍यास भाग पाडावे, ही भाषाप्रेमींची अपेक्षा !

पदभरतीसाठी सातारा जिल्‍हा परिषदेने ऑनलाईन अर्ज मागवले !

सातारा जिल्‍हा निवड समितीच्‍या वतीने सातारा जिल्‍हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदांच्‍या भरतीविषयी पात्र उमेदवारांकडून ५ ते २५ ऑगस्‍ट या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्‍यात येत आहेत, अशी माहिती जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी आणि उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्रापूर (पुणे) महाविद्यालयाच्‍या गलथान कारभारामुळे बी.कॉम.च्‍या प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण !

महाविद्यालयाने पुढाकार घेऊन वेळेत समस्‍या सोडवणे आवश्‍यक आहे. यामध्‍ये विद्यार्थ्‍यांना झालेल्‍या मनस्‍तापाला कोण उत्तरदायी ?

गोवा विद्यापिठात कर्मचारी भरती घोटाळा झाल्याचा संशय

गोवा सरकारने नोकर भरतीसाठी ‘भरती आयोग’ही स्थापन केलेला आहे; मात्र गोवा विद्यापिठात नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आहे कि नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ऑस्ट्रेलियातील शाळांमध्ये शीख विद्यार्थ्यांना ‘कृपाण’ बाळगण्यास न्यायालयाची अनुमती !

देशातील क्वीन्सलँड प्रांतातील सरकारने शाळांमध्ये शीख विद्यार्थ्यांना स्वत:समवेत ‘कृपाण’ बाळगण्यावर प्रतिबंध लादला होता.